ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

शरद पवार व राष्ट्रवादीमुळेच शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील जाहीर कार्यक्रमात म्हणाले…

जळगाव| शिवसेनेचे नेते आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील  यांनी आपण मंत्री झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाविरोधात कायम बोलत राहिलो आणि लढत राहिलो. परंतु याच राष्‍ट्रवादी पक्षामुळे, तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्‍यामुळे मला मंत्रीपद मिळाले. त्‍या पक्षाने काय जादू केली समजेना. अशा शब्दात पालकमंत्री पाटील यांनी पवार यांच्या उपस्थितीत आपल्या भावना व्यक्त केल्या.

धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे माजी आमदार मुगम पवार यांच्‍या पुतळ्याच्‍या अनावरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ते आपले मनोगत व्यक्त करत होते. कार्यक्रमास राष्‍ट्रवादीचे काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे आदी नेते उपस्‍थित होते.

मी कायम राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात लढणारा माणूस होतो- गुलाबराव पाटील

पालकमंत्री पाटील म्‍हणाले, जेव्हा पक्षीय राजकारण चालते, मग तो काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा भाजप असेल किंवा शिवसेना असेल, आम्ही कधीही व्‍यक्‍तीगत राजकारणाला महत्व दिले नाही. आपण नेहमीच विचारांच्‍या राजकारला महत्व दिले आहे. विचारांच्या राजकारणामुळेच आपण या ठिकाणी काम करू शकलो. सार्वजनिक जीवनात काम करत असताना मी कायम राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात लढणारा मी कार्यकर्ता होतो, कायम राष्ट्रवादीविरोधात लढणारा मी माणूस होतो. परंतु, मला काय माहिती की, शरद पवा हेच मला मंत्री करतील. आयुष्‍यभर ज्‍यांच्‍यावर टिका करत राहिलो त्‍या पक्षाने काय जादू केली समजेना. रात्री आमचे नाव जाहीर झाले; परंतु सकाळच्‍या शपथेने धक्‍काच बसला. योगायोगाने सरकार आले व मंत्री म्‍हणून कामही करू लागलो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button