breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

शिवसेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांंमध्ये जोरदार खडाजंगी! आमदार वैभव नाईक यांच्यासह ४० जणांवर गुन्हा दाखल

सावंतवाडी |

कुडाळ येथे शनिवारी शिवसेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांंमध्ये जोरदार खडाजंगी उडाली होती. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांच्यासह ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुडाळ येथे शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून कुडाळ शहराच्या मध्यवर्ती असलेल्या पेट्रोल पंपवर १०० रुपयांत प्रति वाहन दोन लिटर पेट्रोल तर भाजप सदस्यांचे ओळखपत्र दाखवणाऱ्याला १ लिटर मोफत पेट्रोल देणार असल्याचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी जाहीर केले होते.

त्यानंतर शिवसेना भाजप कार्यकर्त्यांंनी जोरदार घोषणाबाजी करत राडा करण्याचा प्रयत्न झाला होता. शनिवारी सकाळी आमदार वैभव नाईक व त्याचे कार्यकर्ते भारत पेट्रोल पंपवर आल्यानंतर भाजप सेना कार्यकर्त्यांंमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे वातावरण तंग झाले. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जमावबंदीचे उल्लंघन केले. याप्रकरणी सेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह सेना भाजपच्या ४० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,अशी माहिती पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button