breaking-newsताज्या घडामोडीपुणे

Shirur Loksabha : कार्यकर्त्यांच्या जल्लोषपूर्ण वातावरणात आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे, (महा-ई-न्यूज ) – शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप, महायुतीचे उमेदवारी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज मंगळवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, विजयबापू शिवतारे, भाजप नेते गिरीष बापत, निलम गोऱ्हे, रघुनाथ कौशीक, शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, आमदार महेश लमडगे, सुरेश गोरे, शरद सोनावणे, योगेश टिकेकर, बाबुराव पाचारने आणि शिवसेना भाजप महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संस्थेने उपस्थित होते.

मंगळवारी सकाळी गळ्यामध्ये भगवी उपरणी, टोप्या घालून शिवसेना भाजपचे झेंडे हातात घेऊन ढोल ताशांच्या गजरात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची रॅली निघाली. दुपारच्या सुमारास शिवसेना, भाजप नेत्यांसह हजारो शिवसैनिक, महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या साक्षिने आढळराव पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपला उमेदवारी अर्ज भरला.

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूरमधून तीन वेळा लोकसभा निवडणूक जिंकली असून चौथ्यांदा विजयासाठी सज्ज आहेत. त्यांच्या समोर राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांचे आव्हान आहे. गेल्या निवडणुकीमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तीन लाखांच्यापेक्षा जास्त मतांनी दणदणीत विजय मिळवला होता. आपल्या अष्टपैलू वक्तृत्वाच्या जोरावर त्यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button