ताज्या घडामोडीमुंबई

शीळफाटा रस्ता दहा दिवसांत वाहतुकीसाठी खुला; वाहनचालकांना दिलासा

डोंबिवली | दुरवस्था झालेल्या शीळफाटा खिंड ते महापे रस्त्याचे काम युद्धपातळीवर दहा दिवसांतपूर्ण करीत शुक्रवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे नवी मुंबईकडे येणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळाला असून वाहतूक कोंडीसह वळसा घालून सुरू असलेला प्रवासातून सुटका झाली आहे.

शीळफाटा दत्तमंदिर चौकातून एक रस्ता ठाणे, दुसरा पनवेल, तिसरा रस्ता कल्याण-बदलापूर दिशेकडे जातो. चौथा रस्ता चौकातून नवी मुंबईत जातो. नवी मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुला एमआयडीसीच्या बारवी धरणाकडून आलेल्या जलवाहिन्या आहेत. या जलवाहिन्यांमधून नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा केला जातो. या जलवाहिन्यांच्या बाजूला एमआयडीसीने सेवा रस्ता बांधला आहे. हा रस्ता फक्त जलवाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी असल्याने या रस्त्यावर फक्त एमआयडीसीचा अधिकार आहे. शीळफाटा दत्तमंदिर चौकातून जलवाहिन्या असलेल्या या खिंडीतील रस्त्यावरून महापे दिशेने जाण्यासाठी मधला रस्ता आहे. हा रस्ता ३०० मीटरचा आहे. या रस्त्याची जूनपासून मुसळधार पावसाने दुरवस्था झाली होती. तात्पुरती खडी टाकून हा रस्ता एमआयडीसीकडून दुरुस्त केला जात होता. पण सततचा पाऊस, वाहनांच्या वर्दळीमुळे या रस्त्याची चाळण झाली होती. या रस्त्यावरून वाहने चालविताना चालकांना कसरत आणि प्रवाशांची आदळआपट होत होती.

हा रस्ता खराब असल्याने अनेक वाहन चालकांना शीळफाटा चौकातून मुंब्रा दिशेने जाऊन वळण घेऊन मग महापे दिशेने जावे लागत होते. या वळशामुळे प्रवाशांना मुंब्रा दिशेकडील अवजड वाहतूक कोंडीत अडकावे लागत होते. त्यामुळे खिंडीतील रस्ता दुरुस्त करावा अशी प्रवाशांची मागणी होती. खिंडीतील रस्त्यावरून कल्याण, बदलापूर, पनवेलकडून येणारी जाणारी वाहने वाहतूक करतात. गेल्या १० महिन्यांपासून स्थानिक आमदार प्रमोद पाटील शीळफाटा खिंडीतील रस्त्याची दुरुस्त करावी म्हणून एमआयडीसी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button