breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारण

शशिकांत शिंदे 1 मताने हरले! राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बिथरले, राष्ट्रवादीचे कार्यालयच फोडले…

सांगली |

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा आज निकाल लागत आहे. मात्र या निकालाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यामधील राष्ट्रवादी काँग्रेसमधील धुसपूस पुन्हा एकदा समोर आली आहे. सातारा जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे. या निवडणुकीमध्ये जावळी सोसायटी मतदार संघातून माजी मंत्री शशिकांत शिंदे हे पराभूत झाले आहेत. शिंदे अवघ्या एका मताने पराभूत झाल्याने त्यांच्या समर्थकांनी संतापाच्या भरामध्ये आपल्याच पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केल्याचा आरोप केला जातोय.

शिकांत शिंदेंचा विजय असो अशा घोषणा देण्यात आलेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून ज्यांनी शशिकांत शिंदेंविरोधात या निवडणुकीमध्ये कट रचला, त्याचा निषेध म्हणून आम्ही राष्ट्रवादी भवनावर दगडफेक केलीय, असं दगडफेक करणाऱ्या शिंदे समर्थकांनी सांगितलं आहे. आम्ही सर्व राष्ट्रवादीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. आज फक्त एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलल्यात आल्याने आम्ही दगडफेक करुन निषेध करत आहोत, असंही या कार्यकर्त्यांनी सांगितलं.

शशिकांत शिंदे यांचा पराभव हा जाणीवपूर्वक पद्धतीने घडवून आणल्याने आम्ही त्याचा निषेध करतोय. निवडणूक जाहीर झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांना जाणीवपूर्वक पद्धतीने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गाफील ठेवलं. शरद पवार आणि अजित पवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सूचना करुनही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिंदे यांना अडचणीत आणलं. जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष वाढवणारा एकमेव नेता आहे. जिल्हाभर फिरुन राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याचं काम त्यांनी केलंय. पण काही लोकांना हे रुचत नव्हतं की शशिकांत शिंदे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचं नेतृत्व बनू पाहत आहेत. त्यामुळेच जाणीवपूर्वक हा पराभव घडवून आणल्याचा आरोप शिंदे समर्थकांनी केलाय.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपाच्या साथीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील हे आठ मतांनी जिंकले. कराड सोसायटी मतदार संघातून बाळासाहेब पाटील यांनी निवडणूक लढवली होती. तर दुसरीकडे शिवसेनेचे गृह व वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचा पाटण सोसायटी मतदार संघातून १४ मतांनी पराभव झाला. शिंदे यांचा पराभव होताना दुसरीकडे खटाव सोसायटी मतदार संघातून बंडखोरी केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रभाकर घार्गे हे कारागृहात असतानाही निवडून आल्याने हे दोन्ही निकाल खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी धक्कादायक ठरले आहेत. यापूर्वी ११ जागा बिनविरोध झाल्याने दहा जागांसाठी कमालीच्या चुरशीने व संवेदनशीलपणे परवा मतदान झाले होते. त्याची आज साताऱ्यात मतमोजणी सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button