ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘या’ कंपनीच्या शेअर्सनी 1 लाखांचे झाले तब्बल 66 लाख

शेअर बाजारातील आणखी एका शेअरने अवघ्या १० महिन्यांत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गुंतवणूकदारांना मालामाल करणारे हे शेअर्स EKI एनर्जी सर्व्हिसेसचे आहेत. कंपनीच्या शेअर्सनी 10 महिन्यांत लोकांना 6500 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.7 एप्रिल 2021 रोजी EKI एनर्जी सर्व्हिसेसचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 147 रुपयांच्या स्तरावर होते. तसेच 16 ऑगस्ट 2021 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनीचे शेअर्स 1,567.05 रुपयांवर होते. तर, 14 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 9700 रुपयांच्या स्तरावर होते. म्हणजेच कंपनीच्या शेअर्सनी गेल्या 10 महिन्यांत सुमारे 6600 टक्के परतावा दिला आहे. म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीने 7 एप्रिल 2021 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर आता त्या 1 लाख रुपयांचे तब्बल 66 लाख रुपये झाले असते. त्याचबरोबर कंपनीच्या शेअर्सनी 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना 521 टक्के परतावा दिला आहे. ज्या व्यक्तीने 16 ऑगस्ट 2021 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल त्या व्यक्तीच्या 1 लाख रुपयांचे आता 6.18 लाख रुपये झाले असतील.

EKI एनर्जी सर्व्हिसेस हे कार्बन क्रेडिट डेव्हलपर आणि सप्लायर आहेत. EKI एनर्जी सर्व्हिसेसने गेल्या वर्षी त्यांचा आयपीओ आणला होता. कंपनीने गुंतवणूकदारांना 102 रुपये किंमतीला शेअर्स अलॉट केले होते. कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 12,599.95 रुपये आहे. तर 52 आठवड्यांसाठी कमीत कमी किंमत 140 रुपये आहे.[google_map]

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button