breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

राज्यातील सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त कोविड सेंटर उभारावेत, शरद पवारांचे आवाहन

नाशिक – राज्यात कोरोना रुग्णांची  संख्या झपाट्याने वाढत असल्याने रुग्णालय आणि कोविड सेंटरची  अत्यावश्यकता आहे.ही गरज लक्षात घेऊन राज्यातील सामाजिक संस्थांनी कोविड सेंटर उभारावेत असे आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. ते नाशिकमधील कोविड सेंटरच्या उद्घाटनावेळी बोलत होते.

नाशिकमध्ये भूजबळ नॉलेज सिटी, महानगरपालिका, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुलात २९५ बेड़्सचे कोविड सेंटर उभारले आहे. या कोविड सेंटरमध्ये १८० ऑक्सिजन बेड्स असून ११५ सीसीसी बेड्स आहेत. या कोविड सेंटरचे उद्घाटन आज शरद पवार आणि अन्न नागरी पुरवठा आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन स्वरूपात पार पडले.

‘कोरोनाच्या संकटात रुग्णांच्या मदतीसाठी त्यांना आधार देणारे वैशिष्ट्यपूर्ण व नावीन्यपूर्ण असे ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था असलेले कोविड केअर सेंटर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली भुजबळ नॉलेज सिटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नाशिकमध्ये तयार केले आहे. भुजबळांनी हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा असून हे कोविड केअर सेंटर राज्यातील इतर संस्थाना कोरोनाच्या लढाईत काम करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल,’ असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.

भुजबळांचे आवाहन

कोविडचे मोठं संकट आपल्यासमोर उभे राहिले असून राज्यातील उद्योजक, साखर कारखानदार, शैक्षणिक संस्था, समाजसेवी संस्थांनी कोरोनाच्या लढाईत योगदान द्यावे, असे आवाहन छगन भुजबळ यांनी यावेळी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button