Views:
14
नवी दिल्ली | उत्तर-पूर्व दिल्लीच्या गोकुळ पुरी गावातील झोपडपट्टीला शुक्रवारी मध्यरात्रीनंतर १.३० च्या सुमारास भीषण आग लागली. त्यात ६० पेक्षा अधिक झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी १३ फायर इंजिनच्या मदतीने पहाटे ४ च्या सुमारास आग आटोक्यात आणली. सध्या तेथे कूलिंगचे काम सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
गोकुळ पुरी गावातील झोपडपट्टीला शुक्रवारी मध्यरात्री दीडनंतर आग लागली. त्यात ६० पेक्षा अधिक झोपड्या जळून बेचिराख झाल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान १३ फायर इंजिनसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तीन-साडेतीन तास निकराची झुंज देऊन आग आटोक्यात आणली. या आगीत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३० झोवड्या जळून खाक झाल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे.