breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपुणे

२२० महाविद्यालयांमध्ये रविवारी होणार ‘सेट’ परीक्षा

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे  विद्यापीठ  आणि महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) यांच्या वतीने सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी ‘राज्यस्तरीय पात्रता परीक्षा’ (सेट) रविवार आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह  गोव्यातील  विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येत आहे.

महाराष्ट्र व गोवा राज्यातील एकूण २२० महाविद्यालयांमध्ये या परीक्षेचे आयोजन केले आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोवा राज्य अशा एकूण १५ ठिकाणी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी ९८ हजार ३६० विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. यातील तब्बल १५ हजार ६२३ विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यासाठी पुणे शहर केंद्र निवडले आहे. या सर्व विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील ३० महाविद्यालयांमध्ये करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रवेशपत्रे १६ सप्टेंबरपासून ‘http://setexam.unipune.ac.in’ या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा विचार करता प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी परीक्षा केंद्रावरील सर्व संपर्क प्रतिनिधींना सूचना देण्यात आली आहे. तसेच सर्व महाविद्यालयांना प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. सेट परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना काही समस्या असल्यास त्यांनी ०२०- २५६२२४४६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन सेट परीक्षेचे सदस्य सचिव आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button