ताज्या घडामोडीराष्ट्रिय

सेन्सेक्स १३, तर निफ्टी ५ अंकांनी घसरला

काल शेअर मार्केटची परिस्थिती पाहता, रशिया-युक्रेन युद्धाचे सावट भारतीय शेअर बाजारावरून हटल्याचं दिसून आलं. सलग पाचव्या सत्रामध्ये शेअर बाजार वधारला असून आज आज बाजार बंद होताना सेन्सेक्स 935 अंकांनी वधारला तर निफ्टीही 240 अंकानी वधारला होता. तर आज उघडताच सुरुवातीला हिरव्या फितीत असलेला बाजार पुन्हा अस्थिर स्थितीमुळे लाल फितीत आल्याचे दिसत आहे. सेन्सेक्स 13 आणि निफ्टी 5 अंकांनी घसरल्याचे चित्र आहे.

आज सकाळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 177 अंकांच्या वाढीसह 56,603 वर, तर निफ्टी 29 अंकांच्या वाढीसह 16,900 वर उघडला. सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी 24 समभाग हिरव्या चिन्हात आणि 6 लाल चिन्हात व्यवहार करत होते. तर दुसरीकडे, निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 37 शेअर्स हिरव्या चिन्हात आणि 13 शेअर्स लाल चिन्हात व्यवहार करत होते.

महत्त्वाचे म्हणजे कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. क्रूड ऑइल 102 डॉलर प्रति बॅरलवर आहे. तर डॉलरच्या तुलनेत रुपया 76.33 वर आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे रुपयावर दबाव कायम राहिला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button