breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुब्रता मुखर्जी यांचे निधन

कोलकाता – तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगालचे मंत्री सुब्रत मुखर्जी यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. सुब्रत मुखर्जी यांच्यावर हृदयाशीसंबंधित आजारामुळे कोलकाताच्या एसएसकेएम या सरकारी रुग्णालयात गेल्या आठवडाभरापासून उपचार सुरू होते. मात्र काल वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुब्रत मुखर्जी यांना छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने एसएसकेएममध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयातील कार्डिओलॉजीच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्यावर अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती, मात्र गुरुवारी संध्याकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच रात्री ९ वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या धमनीत स्टेंट टाकल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडली होती.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुब्रत मुखर्जी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘मला विश्वासच बसत नाही की ते आता आमच्यात नाहीत. ते पक्षाचे समर्पित नेते होते. त्यांच्या निधानाने आमचे वैयक्तिक नुकसान झाले आहे’, असे ममता यांनी म्हटले. त्याचबरोबर सुब्रत यांच्या निधनाची माहिती मिळताच त्या रुग्णालयात पोहोचल्या आणि त्यांनी मुखर्जी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. ‘एसएसकेएम रुग्णालयात त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असता उद्या त्यांना डिस्चार्ज मिळेल. असे रुग्णालयाने सांगितले होते. मात्र संध्याकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण ते अयशस्वी ठरले’, असे ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांना सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button