breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

ईडीचे वरिष्ठ अधिकारी राजेश्वर सिंह लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार

नवी दिल्ली – काँग्रेस नेत्यांच्या विरोधातील कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावणारे ईडीचे वरिष्ठ अधिकारी राजेश्वर सिंह आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांची बहीण आभा सिंहने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये ते स्वेच्छानिवृत्ती घेऊन वेगळ्या माध्यमातून देशाची सेवा करणार असल्याचे म्हटले आहे. टू-जी स्पेक्ट्रम, कोळसा घोटाळा, कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा, ऑगस्टा वेस्टलँड अशा प्रकरणांमध्ये राजेश्वर सिंह यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे.

राजेश्वर सिंह २००९ मध्ये ईडीत प्रतिनियुक्तीवर आले. तेव्हापासून त्यांनी अनेक हाय प्रोफाईल केसेसची तपासणी केली आहे. एअरटेल मॅक्सिम, टू-जी स्पेक्ट्रम, कोळसा घोटाळा, कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा, ऑगस्टा वेस्टलँड अशा अनेक प्रकरणांचा तपास त्यांनी केला आहे. त्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यापूर्वी एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी त्यांची ओळख होती. राजेश्वर सिंह यांनी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कीर्ती चिदंबरम यांच्या विरोधातील भ्रष्टाचारांच्या प्रकरणांच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र आता ते स्वेच्छानिवृत्ती घेऊन भाजपत दाखल होणार आहेत. तसे ट्विट त्यांच्या बहिणीने केले आहे. उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सध्या ते उत्तर प्रदेशतील लखनऊमध्ये ईडीचे संयुक्त संचालक म्हणून कार्यरत आहेत. उत्तर प्रदेशातील सुलतानपूरचे ते मूळ रहिवासी आहेत. कायदा आणि मानवाधिकार क्षेत्रात त्यांनी पदवी घेतली आहे. २०१८ मध्ये राजेश्वर सिंह यांच्या विरोधात एका प्रकरणात चौकशी सुरू होती. पण त्यातून ते निर्दोष सुटले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button