ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
मॉलच्या इमारतीवरून पडल्याने सुरक्षा रक्षकाचा मृत्यू
पिंपरी चिंचव | मोशी येथील स्पाईन मॉलच्या इमारतीवरून पडून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 12) पहाटे उघडकीस आली. प्रवीण चंद्रकांत जाचक (वय 28, रा. संजय गांधी नगर, मोशी) असे मृत्यू झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण हा मोशीतील स्पाईन मॉलच्या पहिल्या मजल्यावर ड्युटी करीत होता. पहाटे चार ते पाच वाजताच्या सुमारास तो इमारतीवरून पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याबाबत आकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे. या मॉलमधील सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.