शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राला सेबीने ठोठावला ३ लाखांचा दंड
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा हा अश्लिल चित्रपट निर्मिती प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असताना आता शिल्पा शेट्टी आणि राज या दोघांनाही सेबीने मोठा दंड ठोठावला आहे. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या वियान इंडस्ट्रीजने सेबीच्या इनसायडर ट्रेडिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना ३ लाखांचा दंड ठोठावला आहे.
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई न्यायालयाने १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे सेबीने काल राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरोधात कारवाई केली. सेबीने हा दंड वियान इंडस्ट्रीजने सेबीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे लावला आहे. यानिमित्ताने शिल्पा शेट्टी हिच्यासमोर आता आणखी एक संकट उभे राहिल्याचे बोलले जात आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झालेल्या उद्योगपती राज कुंद्रा यांचे बँक खाते आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने फॉरेन्सिक ऑडिटरची नेमणूक केली आहे.
गुन्हे शाखेच्या मते, कंपनीशी संबंधित राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी, अरविंद श्रीवास्तव, हर्षिता श्रीवास्तव आणि इतरांच्या बँक खात्यांची चौकशी करण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिटर्सना बोलवण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणात राज कुंद्राची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांना अद्याप क्लीन चिट दिलेली नाही. कुंद्राचे बँक खाते आणि वियान इंडस्ट्रीजचे संयुक्त खाते, ज्यात शिल्पा शेट्टी दिग्दर्शक होत्या, याचीही चौकशी सुरू आहे. ही कंपनी कथित पॉर्न फिल्म प्रकरणाच्या मध्यभागी आहे. कुंद्राकडे अशी अनेक बँक खाती आहेत ज्यात परदेशातून पैसे जमा झाले होते. शेट्टी यांनी संचालित केलेल्या कोणत्याही बँक खात्यातील व्यवहारांची माहिती आतापर्यंत तपासकार्याच्या निदर्शनास आलेली नाही, मात्र हा तपासाचा भाग असल्याने खात्यांची तपासणी केली जात आहे, त्यामुळे शिल्पा शेट्टी यांना अद्याप क्लीन चिट देण्यात आलेली नाही. मात्र, आम्ही कोणाच्याही वैयक्तिक खात्यांशी संबंधित नाही असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.