breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

पेटीएमच्या आयपीओला सेबीची मंजुरी १६,६०० कोटींचा सर्वात मोठा आयपीओ

मुंबई – पेटीएमच्या आयपीओला सेबीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आजवरचा शेअर बाजारातील तो सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे, असे ब्लूमबर्गने अहवालात म्हटले आहे.१६ हजार ६०० कोटींचा हा आयपीओ नोव्हेंबरमध्ये शेअर बाजारात लिस्टिंग होणार आहे. मात्र याबाबत पेटीएमने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

२०१३ मध्ये भारतीय शेअर बाजारात कोल इंडियाचा सर्वात मोठा आयपीओ आला होता. तो १५ हजार कोटींचा होता. मात्र त्यानंतर आता डिजिटल पेमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी पेटीएमचा आयपीओ येणार आहे. त्यात पेटीएम प्रायमरी सेलमध्ये ८ हजार ३०० कोटी रुपयांचे समभाग विकणार असून उर्वरित ८ हजार ३०० कोटींचे समभाग ऑफर फॉर सेलमधून विकणार आहे. म्हणजे १६ हजार ६०० कोटींचे भाग भांडवल शेअर बाजारातून उभारण्याचा कंपनीचा उद्देश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button