breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकराष्ट्रिय

कोरोनाचे काटेकोर नियम पाळून उत्तर प्रदेश, दिल्लीत शाळा सुरू

नवी दिल्ली – कोरोनाची परिस्थिती आता बऱ्यापैकी निवळली असल्यामुळे बहुतेक राज्यांमधील शाळा आणि महाविद्यालये आता पुन्हा सुरू होत आहेत. त्यात आज उत्तर प्रदेशात पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाले. दोन शिफ्टमध्ये हे वर्ग भरवण्यात येणार आहेत. याशिवाय दिल्लीतही नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून देशातील शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. त्याला आता दीड वर्ष झालं. ऑनलाईन शिक्षणाचा मोठा परिणाम विद्यार्थ्यांवर झाला आहे. परंतु आता कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी आजपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थानचा समावेश आहे. या राज्यांमध्ये कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशात पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शिक्षण परिषदेच्या देखरेखीखाली हे वर्ग सुरू केले आहेत. या शाळांमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन होते की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी खास पथके तयार करण्यात आली आहेत. आज सकाळी आठ वाजल्यापासून उत्तर प्रदेशातील शाळा सुरू झाल्या. त्या दोन शिफ्टमध्ये चालणार आहेत. ऑफलाईनबरोबरच ऑनलाईन क्लासही सुरू ठेवण्यात आले आहेत. तर दिल्लीत नववी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू झाले आहेत. तसेच मध्य प्रदेशात दहावी ते बारावीचे वर्ग आज सुरू झाले आणि राजस्थानात आजपासून नववी ते अकरावीचे वर्ग सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरू झाले असून दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आठ वाजल्यापासून शाळेत जाणार आहेत. दरम्यान, आठवीच्या आतील वर्ग सुरू करण्याचा कोणताही निर्णय अजून सरकारने घेतलेला नाही. तर कर्नाटकातही आजपासून शाळांना परवानगी दिली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button