ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुण्यातील शाळा, महाविद्यालये 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार – अजित पवार

पिंपरी चिंचवड | पुण्यातील शाळा-महाविद्यालये कधी सुरू होणार याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, पहिले ते आठवी पर्यंतच्या शाळा 1 फेब्रुवारी पासून अर्धवेळ तर त्यापुढील वर्ग पूर्ण वेळ सुरु करण्यात येणार आहे. आज पुणे कोरोना आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मास्कमुक्त महाराष्ट्राबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात पुन्हा एकदा करोनाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यासोबत ओमायक्रॉनचा धोकाही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र, त्यानंतर राज्य सरकारने राज्यभरातील 23 जानेवारीपासून शाळा सुरु करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार काही सोमवारपासून काही भागातील शाळा सुरूही झाल्या. मात्र, पुण्यातील शाळा अद्याप बंदच होत्या.

दरम्यान आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे की, पहिले ते आठवी पर्यंतच्या शाळा 1 फेब्रुवारी पासून अर्धवेळ सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, दुपारचे जेवण मुले घरी करतील तर नववीपासून पुढील वर्गांची शाळा पूर्णवेळ असेल, असे त्यानी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button