ताज्या घडामोडीपुणे

शिवसेना नेता रघुनाथ कुचिकने अत्याचार केलेल्या मुलीला वाचवा; चित्रा वाघांची ठाकरे सरकारला साद

पुणे | शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका तरुणीने लग्नाचे आश्वासन देऊन अत्याचार आणि नंतर गर्भपात करायला लावल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणात न्यायालयात धाव घेतलेल्या कुचिक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला होता. परंतू या प्रकरणातील पीडित तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी पीडित तरुणीने फेसबूकवर व्हिडीओ पोस्ट करत कुचिक यांच्यावर गंभीर आरोप करत जीवन संपवत असल्याचे सांगितले. या घटनेची दखल घेत भापजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी याबाबत ‘शिवसेना नेता रघुनाथ कुचिकने अत्याचार केलेल्या त्या मुलीला वाचवा’ अशी ठाकरे सरकारला भावनिक साद घातली आहे. तसेच कुचिकवर ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील केली आहे.

चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, या पीडित मुलीने समोर येऊन या सगळ्या गोष्टी सांगितल्या. एवढ्या गोष्टी, पुरावे असतानाही त्यांना जामीन कसा मिळतो, हे मला माहीत नाही. दोनदा त्याला जामीन मिळाला आहे. कुचिक त्या मुलीवर दबाव आणत आहेत. केस मागे घेण्यासाठी तिला मेसेज करतोय. या कुचिक यांच्या मागे त्यांचा करता करविता आणि बोलविता धनी कोण आहे? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेना नेत्याने अत्याचार केलेल्या मुलीचे बरेवाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार राहील. अत्याचारीत तरूणीने फेसबूकवर पोस्ट करत कुठूनही न्याय मिळत नसल्याने आत्महत्या करते असे लिहीले आहे. पुणे पोलिस आयुक्त, सहआयुक्त, गृहमंत्री सगळ्यांना कळवलयं. त्या मुलीने फेसबूक पोस्टचे स्कीनशाँट पाठविले आहेत. संबधितांना अनेक फोन केले पण एकानेही फोन उचलले नाहीत कि मॅसेज बघूनही रिप्लाय दिला नाही. तिच्या जीवाचे बरेवाईट झाले तर सर्वस्वी जबाबदार सरकार व पोलिस असतील हे लक्षात ठेवा. मुलगी मेल्यावर सगळ्या यंत्रणा खडबडून जाग्या होतील. तिच्या मरणाची वाट पाहू नका. वाचवा त्या मुलीला,’ असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button