breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सेव्ह रेस्टॉरंट…सेव्ह अवर एम्प्लाईज.. : पिंपरी-चिंचवडमध्ये हॉटेल व्यवसायिकांची निदर्शने

भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांचा पुढाकार

पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील लॉकडाउनला व्यवसायिकांचा विरोध आहे. लॉकडाउनमुळे हॉटेल व्यवसायिक अडचणीत आले आहेत. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे शासनाने लॉकडाउन करु नये, अशी मागणी करीत भोसरीतील हॉटेल व्यवसायिकांनी निदर्शने केली.
यावेळी भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष शिवराज लांडगे, स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांच्यासह हॉटेल कर्मचारी उपस्थित होते.
शिवराज लांडगे म्हणाले की, लोकांना कोविडच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहोत. जनजागृती, अन्नधान्य वाटप, रुग्णांच्या नातेवाईकांना मदत, सॅनिटाईझर- मास्क वाटप, कम्युनिटी किचन आदी विविध उपक्रमांतून मदत केली आहे. ‘लॉकडाउन- १ मध्ये आपण सर्वजण होरपळून निघालो आहोत. आता प्रशासनाने पुन्हा लॉकडॉन-२ ची अंमलबजावणी केली आहे. पुन्हा आपण सर्वजन दूष्टचक्रात अडकलो आहोत. लोकांना बेड, आयसीयू, ऑक्सिजन व्हँटिलेटर, रेमडिसिवर इंजक्शन, प्लाझ्मासाठी किती कसरत करावी लागत आहे. आता हॉटेल व्यवसायिक आणि कर्मचारीही संतापले आहेत. राज्य शासनाने लॉकडाउन करण्यापैक्षा आरोग्य व्यवस्था सक्षम केली पाहिजे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button