TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पठारे तालीम मंडळातील ३६ वर्षांच्या गणेशमूर्तीला साश्रुनयनांनी निरोप

– भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती
– कोरोना नियमांचे पालन करीत यावर्षीही साधेपणाने विसर्जन

पिंपरी । प्रतिनिधी
भोसरीतील प्रसिद्ध पठारे तालीम मित्र मंडळ यावर्षी ६४ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. सामाजिक क्षेत्रात विषेश योगदान असलेल्या या मंडळाची ३६ वर्षे जुनी गणेशमूर्ती अनंत चतुर्दशीला विसर्जीत करण्यात आली. मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी साश्रुनयनांनी गणरायाला निरोप दिला.सालाबादाप्रमाणे याही वर्षी श्री गणेश बाप्पाचे आगमन झाले. मंडळ यावर्षी ६४ व्या वर्षात पदार्पण करत असून, मंडळाची ३६ वर्ष जुनी असलेली गणपतीची मूर्ती मागील वर्षी तडा गेलने मंडळाने यावर्षी सप्त धातूची सुमारे १७५ ते १८० किलो वजनाची मूर्ती अगदी जुन्या मूर्तीच्या साच्यामध्ये घडवून स्थापन केली आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अशोक पठारे यांनी दिली.

तसेच, मोठ्या हर्ष उल्हासात गणपती बाप्पाची १० दिवस मनोभावे सेवा करून शेवटच्या दिवशी विसर्जनाला पठारे लांडगे तालीम व्यायाम मंडळाचे सर्व सभासद पदाधिकारी उत्सवाचे प्रमुख आमदार महेश लांडगे, अध्यक्ष अशोक पठारे आणि सर्व गणेशभक्त एकत्रित येऊन विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. पारंपारिक वाद्यांच्या गजरामध्ये कोरोना नियमांचे पालन करीत मिरवणूक काढून श्री गणरायाला निरोप देण्याची परंपरा आहे. पण, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे उल्लंघन न करता मंडळाच्या आवारात अगदी साध्या पद्धतीने आकर्षक फुलांनी सुशोभीकरण करून सजवलेल्या पाण्याच्या हौदामध्ये गणरायाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.


आमदार लांडगे म्हणाले की, पठारे तालीम मित्र मंडळाचा गणेशोत्सव हा माझ्यासाठी जिव्हाळ्याचा आहे. आम्ही सर्व सहकारी पदाधिकारी मोठ्या एकोप्याने या उत्सवात सहभागी होत असतो. गतपवर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनाच्या सावटामुळे गणेशोत्सवाच्या जल्लोषाला मर्यादा आल्या. पण, पुढच्या वर्षी निश्चितपणाने कोरोनाचे संकट दूर होईल आणि महाराष्ट्रात पुन्हा जल्लोषात बाप्पा गणरायाचे आगमन होईल, अशी प्रार्थना आम्ही केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button