TOP Newsताज्या घडामोडीपुणे

खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईताला अखेर अटकेत

 पुणे : खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईताला अखेर भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.किरण दिलीप मोरे (वय 24 रा. कोरेगाव पार्क) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकाचे अधिकारी धिरज गुप्ता यांना खबर मिळाली की, मोरे हा त्याच्या राहत्या घरी आईला भेटण्यासाठी येणार आहे. त्यानुसार गुप्ता, पोलीस अंमलदार नरेंद्र महांगरे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, हर्षल शिंदे, राहूल तांबे, अभिजीत जाधव यांनी सापळा रचून त्याला अटक केली.

मोरे हा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात मागील आठ महिन्यापासून फरार होता.याचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button