पिंपरी / चिंचवड

सराईत गुन्हेगाराची पोलिसांना धक्काबुक्की आणि दमदाटी

पिंपरी l प्रतिनिधी

सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आरोपीने धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. ही घटना रविवारी (दि. 15) रात्री पावणे बारा वाजता वैष्णोदेवी मंदिराजवळ पिंपरी येथे घडली.

नितीन उर्फ यंग्या दिलीप शिंदे (वय 34, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक गणेश करपे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन शिंदे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला पकडण्यासाठी रविवारी रात्री पोलीस गेले असता त्याने पोलिसांना अरेरावी व धक्काबुक्की केली. फिर्यादी पोलीस नाईक गणेश करपे यांच्या अंगावर येऊन ‘तुम्ही चूक करताय. मला कोणाच्या सांगण्यावरून पकडताय. सोडा मला. नाहीतर मी तुमची खोटी तक्रार करील’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button