breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“कोठडीचे सॅनिटायझेशन सुरू, बाप बेटे जेलमध्ये…”; संजय राऊतांनी सोमय्यांवर साधला निशाणा

मुंबई |

गेल्या काही दिवसांपासून भाजपने शिवसेना नेत्यांवर गैरव्यवहार व भ्रष्टाचारांच्या आरोपांची राळ उडवली असतानाच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी भाजपवर आरोपास्त्र डागले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय, माजी आमदार किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करत राऊत यांनी भाजपला आक्रमक प्रत्युत्तर दिले. या पत्रकार परिषदेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज सकाळीही राऊत यांनी ट्विटरवरुन एक सूचक ट्विट करत पुन्हा एकदा सोमय्या पिता-पुत्रावर निशाणा साधलाय.

भाजपमधील साडेतीन नेत्यांची प्रकरणे बाहेर काढणार असल्याचे सूतोवाच करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली होती. त्यानुसार शिवसेना भवनवर राऊत यांच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने शिवसेनेने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. शिवसेना भवनबाहेर हजारो शिवसैनिक जमा झाले होते. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय, किरीट सोमय्या व त्यांचे पूत्र आणि मोहित कंबोज या भाजपच्या नेत्यांना राऊत यांनी लक्ष्य केले.

राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा अत्यंत शेलक्या शब्दांत उल्लेख केला. नील किरीट सोमय्या यांची ‘निकॉन इन्फ्रा कन्सट्रक्शन’ ही कंपनी असून वसईतील गोखिवरे येथे मोठा प्रकल्प राबवत असून त्यांचाही पीएमसी बँक घोटाळय़ातील राकेश वाधवानशी संबंध आहे. देवेंद्र लाडानीच्या नावे सोमय्यांनी ४०० कोटी रुपयांची जमीन ४.५ कोटी रुपयांना घेतली. तसेच वाधवान याच्याकडून १०० कोटी रुपये वसूल केले. सोमय्यांच्या प्रकल्पांना पर्यावरण विभागाची परवानगी नाही, असा आरोप करत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्याची दखल घ्यावी, अशी मागणी राऊत यांनी केली. यावेळी किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांना अटक करावी असंही राऊत म्हणाले. याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी आज सकाळी एक ट्विट केलं आहे. “बाप बेटे जेलमध्ये जाणार! वाट पाहा आणि बघत राहा. कोठडीचे सॅनिटायझेशन सुरू आहे,” असं राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच पुणे विमानतळावर पत्राकरांशी संवाद साधताना सोमय्यांनी अनिल परब आणि संजय राऊत यांना लवकरच तुरुंगामध्ये जावं लागणार आहे, असं म्हटलं होतं. अनिल देशमुखांच्या तुरुंगाच्या बाजूची जागा सॅनिटाइज करुन ठेवा पुढचा नंबर अनिल परब आणि संजय राऊतांचा आहे, असं सोमय्यांनी म्हटलं होतं. त्याच मुद्द्यावरुन आता राऊत यांनी कोठडीच्या सॅनिटायझेशनचा उल्लेख केलाय. दरम्यान मंगळवारच्या पत्रकार परिषदेमध्ये राऊत यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना सोमय्यांनी थेट आव्हान दिलंय. ‘‘शिवसेनेच्या मुखपत्रातून २०१७ मध्ये माझ्या पत्नीच्या नावाने असेच आरोप करण्यात आले होते. त्याच बांधकाम व्यावसायिकाचे नाव घेऊन आज माझ्या मुलावर आरोप करण्यात आले. त्याबाबत ठाकरे सरकारने माझी जरुर चौकशी करावी’’, असं सोमय्या म्हणालेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button