TOP Newsपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराष्ट्रियव्यापार

सांगली पतसंस्थेचा हिरक महोत्सव व वीज कामगार मेळावा उत्साहात

भारतीची वाटचाल भांडवलशाहीकडे : दै. सकाळचे संचालक संपादक श्रीराम पवार

  • जनतेच्या मालकीच्या सार्वजनिक उद्योगाचे केंद्र सरकारने विकले हे धोकादायक पाऊल :- मोहन शर्मा

सांगलीः महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन (आयटक) रजि.नं.४३०९ अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ नोकर क्रेडिट को.ऑप.सोसा.लि.विश्रामबाग,सांगली ला ६१ वर्षे पूर्ण होत आहे संस्थेच्या हिरक महोत्सव कार्यक्रम व वीज कामगारांचा भव्य मेळावा व संस्थेस ६१ वर्षे पूर्ण होत आहे. तसेच संघटनेचे अध्यक्ष कॉ .मोहनजी शर्मा हे वयाच्या ८६ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांचा सपत्नीक सत्कार रविवार दिनांक ०४ जून २०२३ रोजी सांगली येथे पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. कॉ. सी. एन. देशमुख कार्याध्यक्ष व अध्यक्ष आयटक महाराष्ट्र, उदघाटक कॉ. मोहन शर्माजी, प्रमुख मार्गदर्शक श्रीराम पवार, संचालक संपादक दैनिक सकाळ कोल्हापूर, मा. कॉ.कृष्णा भोयर सरचिटणीस व सचिव आयटक महाराष्ट्र, कॉ. महेश जोतराव अतिरिक्त सरचिटणीस, पतसंस्थेचे सचिव श्रीमंत खरमाटे, संघटनेचे इतर नेतृत्व तसेच पतसंस्था अध्यक्ष काॅ. राजू माने, पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम. के. गुडी उपस्थित होते.

हिरक महोत्सव समारंभ व कामगार मेळाव्याचे उद्घाटन कामगार नेते कॉम्रेड ए. बी. बर्धन, दत्ता देशमुख, श्याम केरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व मशाल पेटवून करण्यात आले. हीरक महोत्सव समारंभाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे सचिव श्रीमंत खरमाटे यांनी पतसंस्थेच्या ६० वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला. समारंभात संघटनेचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी ८६ वर्षात पदार्पण केल्याबद्दल स्वपत्नी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व विठ्ठल व रखुमाई मूर्ती भेट देऊन विशेष गौरव करण्यात आला. याप्रसंगी कामगार चळवळ राजकीय परिस्थिती वीज उद्योगाची स्थिती याबाबत कॉम्रेड अरुण मस्के आपल्या संघटनेने वीज कामगारांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याकरीता पतसंस्थांची निर्मिती जरी केली असली तरी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत अनेक उपक्रम केले. कॉ. महेश जोतराव संबोधित करताना म्हणाले की वीज कामगाराचे सोडवलेले प्रश्न व प्रलंबित प्रश्न व भविष्यात लढावे लागणारे आहे.

कामगार चळवळ सुद्धा जात धर्म कॅटेगिरीमध्ये विभाग विभाजित झालेली आहे. ही आपल्यासाठी धोक्याची घंटा असून यातून बाहेर पडून संकटितपणे कामगारांनी एकत्रित लढा देण्याची आज गरज आहे. संघटनेने वीज कामाला काय मिळवून दिले. याबाबत विस्तृतपणे विवेचन त्यांनी आपल्या भाषणात केले. कॉम्रेड कृष्णा भोयर संबोधित करताना म्हणाले की देशातील व राज्यातील जनतेच्या मालकीचा वीज उद्योग संकटात सापडलेला आहे.विविध माध्यमाने या उद्योगाचे खाजगीकरण करण्याचे धोरण केंद्र विविध राज्य सरकारने अंगीकारलेले आहे. हे धोरण देशातील व राज्यातील वीज ग्राहकांच्या विरोधात आहे. याचे चटके सामान्य जनतेला सुद्धा बसणार आहेत. वीज ग्राहकाला व वीज कर्मचाऱ्यांचा अधिक बसणार आहे. म्हणून सरकारच्या धोरणाच्या विरोधात आपण संघटितपणे लढले पाहिजे. आयटक महाराष्ट्राचे अध्यक्ष कॉम्रेड सि.एन.देशमुख संबोधित करताना म्हणाले की, वीज कामगार चळवळीने गेल्या ६४ वर्षात वीज कामगारांना जे मिळवून दिले ते टिकवणे गरजेचे आहे. कारण सार्वजनिक संपत्तीचे केंद्रीकरण सरकार करत असून, भांडवलदारांच्या बाजूने कायदे बनवत आहे. सार्वजनिक उद्योग टिकला तरच देशातील कामगारांच्या नोकऱ्या टिकणार आहेत. सध्या मोदी सरकार भांडवलशाहीच्या बाजूने निर्णय घेत असून, त्यांचे निर्णय हे सर्वोच्च स्तरावर पोहोचत आहे. याचा परिणाम देशातील जनतेवर होणार आहे. संघटितपणे या सर्वांचा मुकाबला करण्याकरीता आयटकने मोदी हटाव, देश बचाव हा नारा दिलेला आहे. यामध्ये आपण सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

सकाळ वृत्तपत्र समूहाचे संपादक व संचालक श्रीराम पवार आपल्या संबोधनात म्हणाले की पतसंस्थेने हिरक महोत्सव साजरा करणे व काॅ. मोहन शर्माजीसारख्या समाजासाठी झटणाऱ्या नेत्याचा सत्कार होतो. ही बाब कामगार चळवळीसाठी अतिशय अभिमानास्पद आहे. संघटित क्षेत्रातील कर्मचारी आपल्या मागण्यासाठी लढतातच पण असंघटित क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांच्या पुढे सुद्धा मोठे आव्हाने आहे. संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे लढा दिला पाहिजे, ही काळाची गरज आहे. आज देशांमध्ये अराजक परिस्थिती असून, शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर, जागतिक कीर्तीचे खेळाडू यांना जंतर-मंतरवर आंदोलन करावे लागते. ही बाब फारच दुर्भाग्यपूर्ण बाब आहे. मला कल्पना आहे प्रामाणिकपणे काम करणारे आहेत. त्यांच्या पाठीशी, ज्या कामगारांसाठी ते लढा देतात ते सक्षमपणे उभे राहत नाहीत. संघटित क्षेत्रातील कामगारांना चळवळीने खूप काही मिळवून दिलेले आहे. कामगारांनी भविष्यात येणाऱ्या संकटाकडे लक्ष देऊन संघटितपणे लढले पाहिजे. आज देशांमध्ये क्रोमि कॅपिटल सुरू असून, देशाची सार्वजनिक संपत्ती मोजक्या भांडवलदाराच्या हातात जात आहे. ही आपल्यासाठी धोक्याची घंटा असून, भारत भांडवलशाहीकडे वाटचाल करत आहे. याचा विचार कामगारांनी करावा. सध्या देशात जे काही चाललेले आहे हे अतिशय वाईट आहे. कंत्राटी पद्धतीने कामगार भरणे हायर व फायर या पद्धतीचा वापर करणे. कामगार संघटना मधील बारगेनिंग पॉवर संपत आहे. सहकार चळवळ संपुष्टात आणून एकछत्री भांडवलशाहीचा उद्धार करण्याकरीता सर्व काही सुरू आहे. खाजगीकरण, उदारीकरण हे सामान्यांच्या हिताचे नाही व देशाच्या सुद्धा हिताचे नाही. याचे आकलन करून कामगारांनी देशाच्या राजकीय परिस्थितीवर सुद्धा भाष्य केले पाहिजे. भारतीय अर्थव्यवस्था भांडवलशाहीच्या दिशेने वाटचाल करत आहे. हे आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. याचा विचार आपण करून जागृतपणे सरकारच्या धोरणाच्या विरोधात संघर्ष केला पाहिजे तीच खरी आज काळाची गरज आहे.

आयटक व वीज कामगार नेते मोहन शर्मा संबोधित करताना म्हणाले की, पतसंस्थांची निर्मिती ही त्या काळाची गरज होती. वीज कामगाराच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याकररीता आपण महाराष्ट्रामध्ये पतसंस्थांच्या माध्यमाने सहकार क्षेत्र उभं केलं. त्यामुळे कामगारांच्या आर्थिक गरजा आपल्याला पूर्ण करता आल्या.आज देशातील वीज उद्योग अतिशय आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. याला कारण केंद्र सरकारचे धोरण जबाबदार आहे‌.आपण खाजगीकरणाच्या विरोधात एनरान प्रकल्पापासून लढा देत आहोत. सन २००३ च्या विद्युत कायद्याला विरोध करणारे सुद्धा आपणच होतो. सन २०१४पासून आपण नवीन विघुत कायद्याविरोधात लढा देत सन २०२३ पर्यंत नवीन विद्युत कायदा संसदेमध्ये पास होऊ दिला नाही. हे आपल्या लढ्याचे यश आहे.

केंद्र सरकारचे धोरण कामगार, कष्टकरी, शेतकरी व सामान्य माणसाच्या यांच्या विरोधात आहे. सार्वजनिक उद्योग कवडीमोल भावाने विकण्याचा जो काही सपाटा केंद्र सरकारने लावलेला आहे. हे यापूर्वी कशी कधीही घडलेले नाही म्हणून केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाचा विरोध करण्याकरीता एकत्रित लढण्याची ही काळाची गरज आहे. त्याकरीताच आपली संघटना अग्रभागी राहून काम करत आहे. जनतेच्या मालकीचे सार्वजनिक उद्योग विकण्याचा निर्णय जो मोदी सरकारने घेतलेला आहे तो अत्यंत धोकादायक असून, कामगाराचीच नाही तर या देशातील नागरिकाचे अपरिमित नुकसान यामुळे होणार आहे. म्हणून विरोधास आपण संघटितपणे लढले पाहिजे. हीच काळाची गरज आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोल्हापूर परिमंडळाचे सहसचिव कॉम्रेड सुरेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल कांबळे यांनी केले या समारंभाला शेकडो कर्मचारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button