breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

सांगलीत आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर

सांगली – कोरोनाचा कहर वाढल्याने सांगलीत आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. उद्या, 5 मे रोजी मध्यरात्रीपासून हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी याबाबत घोषणा केली आहे.

जयंत पाटील यांनी ट्विट करून म्हटलंय, आपल्या सर्वांचा जीव वाचणं महत्त्वाचं आहे. त्यासाठीच हा लॉकडाऊन करण्यात येत असल्याचं भावनिक आवाहनही त्यांनी केलं. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ५६८ वर पोहोचली असून काल (सोमवारी) ४० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन सांगली जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सांगलीतील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. प्रशासनाशी चर्चा करून सांगली जिल्ह्यात ५ मे रोजी मध्यरात्रीपासून ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button