breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय
‘उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान..’; संजय राऊतांच्या वक्तव्यावरून मनसेची खोचक टीका
तुम्ही आता पंतप्रधान होणार..मज्जा आहे बाबा
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हे २०२४ लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा उत्तम चेहरा असल्याचं म्हंटलं आहे. महाराष्ट्र मोठं राज्य आहे. ठाकरे हे हिंदुत्ववादी आहेत, याचा विचार आमचे इतर सहकारी भविष्यात करू शकतात, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावरून आता मनसेने जोरदार टोला लगावला आहे.
संजय राऊतांच्या विधानावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे. भावी पंतप्रधानांना शुभेच्छा..भंकस वाटली असेल तर माफ करा. पण बुरा ना मानो होली है, असं ट्वीट देशपांडे यांनी केलं आहे.
तसेच आता तुमच्याशी हिंदीतच बोललं पाहिजे. तुम्ही आता पंतप्रधान होणार..मज्जा आहे बाबा एका माणसाची, असा खोचक टोला संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.