breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

समीर वानखेडेंचा NCBमधला कार्यकाळ संपला; सुशांतसिंह राजपूतपासून आर्यन खानपर्यंत…’अशी’ होती कारकीर्द

मुंबई |

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा कार्यकाळ आज संपत आहे. त्यांनी सेवा मुदतवाढ मागितलेली नाही. एनसीबीकडून ही माहिती देण्यात आली आहे. वानखेडे यांना यापूर्वी सप्टेंबरमध्ये चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. समीर वानखेडे यांनी मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व केल्यानं ते चर्चेत आले. या प्रकरणी बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला ३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. समीर वानखेडे हे २००८ च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेचे अधिकारी आहेत. त्यांचा NCBमधील कार्यकाळ आज समाप्त होत आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीबद्दल…

NCB मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांचा कार्यकाळ 31 डिसेंबरला संपत असून, त्यांनी मुदतवाढ नाकारल्याचं निवेदन एनसीबीने जारी केले होते. ऑगस्ट २०२० ते डिसेंबर २०२० पर्यंत त्यांनी ९६ जणांना अटक केली असून २८ गुन्हे दाखल केले. २०२१ मध्ये त्यांनी २३४ लोकांना अटक केली आणि ११७ गुन्हे दाखल केले. एनसीबीने पुढे माहिती दिली की समीर वानखेडे यांनी सुमारे १००० कोटी रुपयांचे १७९१ किलोपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त केले आणि ११ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता गोठवली.

  • सुशांतसिंह राजपूत ड्रग्ज प्रकरण

समीर वानखेडे यांनी NCB मध्ये काम करण्यापूर्वी एअर इंटेलिजन्स युनिट (AIU) चे उपायुक्त आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) अतिरिक्त एसपी म्हणून काम केलं. नंतर त्यांची कस्टम्स विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आणि मुंबई विमानतळावर त्यांची नियुक्ती झाली. मुंबई एअर इंटेलिजेंस युनिटमध्ये काम करत असताना त्यांनी कस्टम ड्युटी चुकवणाऱ्या अनेक सेलिब्रिटींना पकडले.

ऑगस्ट २०२० मध्ये, सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ते एनसीबीमध्ये दाखल झाले. हे प्रकरण स्वत:च्या हातात घेऊन त्यांनी ३३ हून अधिक जणांना अटक केली. २०२१ मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना गृह मंत्री पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. अभिनेत्री रिया चक्रवर्तीपासून अनेक हाय-प्रोफाइल बॉलीवूड सेलिब्रिटींची वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली चौकशी केली आणि त्यांना अटक केली.

  • बनावट जात प्रमाणपत्र दाखविल्याचा आरोप

या वर्षी ऑक्टोबरमध्ये, समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मुंबईतल्या एका क्रूझवर छापा टाकून ड्रग्जपार्टीवर कारवाई केली आणि आर्यन खानसह इतरांना अटक केली. पण नंतर, एनसीबीने छाप्यादरम्यान वापरलेल्या स्वतंत्र साक्षीदारांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि अंमली पदार्थ विरोधी यंत्रणेच्या अधिका-यांनी शाहरुख खानकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही वानखेडे यांच्यावर आरोप केले. त्यांनी आरोप केला की, हे अधिकारी जन्मतः मुस्लीम आहेत. मात्र नंतर त्यांनी अनुसूचित जातीच्या (एससी) कोट्यात नोकरी मिळवण्यासाठी बनावट प्रमाणपत्रे दाखवली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button