breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“समीर वानखेडेंना तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही”; भरसभेत नवाब मलिकांचे आव्हान

मुंबई |

आर्यन खान प्रकरणानंतर एनसीबी प्रमुख समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. नवाब मलिक यांनी क्रूजवर टाकण्यात आलेल्या छाप्यावर देखील अनेक प्रश्न उपस्थित केले असताना आता त्यांनी थेट समीर वानखेडे यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. करोना काळात सगळे सेलिब्रिटी मालदीवमध्ये असताना समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय मालदीवमध्ये होते, असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच, त्यासंदर्भातले फोटो देखील आपण देणार असल्याचं नवाब मलिक म्हणाले आहेत. दरम्यान, याप्रकरणात समीर वानखेडे यांना तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे थेट आव्हान नवाब मलिक यांनी दिल आहे.

वर्षभरात समीर वानखेडे यांना तुरुंगात टाकेल, असं अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक म्हणाले. माझ्या जावयाला तुरुंगात टाकले आणि आता फोन करत आहेत की यात माझा संबंध नाही. समीर वानखेडे यांना तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे मलिक म्हणाले. ते पिंपरी चिंचवड येथे बोलत होते. “एनसीबी खोट्या केसेस दाखल करत आहे. हे सिद्ध केल्याशिवाय आम्ही थांबनार नाही. हे अधिकारी आणि भाजपाचे नेते लोकांवर दबाव निर्णान करुन या संस्थेच्या मार्फत हजारो कोटींचा वसुलीचा व्यवसाय महाराष्ट्रात करत आहेत. यांचा घोटाळा उघडीस आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही,” असा इशारा नवाब मलिक यांनी दिला.

“मी वानखेडेंना आव्हान देतो वर्षभरात त्यांची नोकरी जाईल. तुम्ही आम्हाला तुरुंगात टाकायला पुढं आले होते. आता देशातील जनता तुम्हाला तुरुंगात जातांना बघेल. तुम्ही कीती बोगस माणूस आहात याचे आमच्याकडे पुरावे आहेत. आगामी काळात ते पुरावे आम्ही बाहेर काढणार आहोत. माझ्या जावयाला तुरुंगात टाकण्यासाठी त्यांच्यावर वरुन दबाव होता, असे वानखेडे सांगतात. पण आता नवाब मलिक कुणाच्या बापाला घाबरत नाही”, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला. नवाब मलिक म्हणाले, “ईडी, सीबीआय, एनसीबी संस्थांचा वापर करुन सरकार पाडण्याचा डाव राज्यात सुरु आहे. पण कुठलाही मंत्री घाबरणार नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. अर्धे मंत्रिमंडळ तुरुंगात जाईल. मात्र अशा पोकळ धमक्यांना घाबरणारे हे महाविकास आघाडीचे सरकार नाही. तुम्हाला नेस्तनाबूत केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button