पिंपरी / चिंचवड

रेशनिंगच्या मालाची काळ्या बाजारात विक्री ; तिघांना अटक, 28 लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी l प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारने बारणे इंडस्ट्रियल इस्टेट, थेरगाव येथे शनिवारी (दि. 12) मध्यरात्री कारवाई केली. रेशनिंगचा माल काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री करणा-या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून यामध्ये तब्बल 28 लाख 29 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

बाळासाहेब भास्कर जाधव (वय 37, रा. एकलहारे, ता. आंबेगाव, पुणे), कल्पेश दत्तात्रय कापडी (वय 33, रा. पारगाव शिंगवे, ता. आंबेगाव, पुणे), छोटेलाल राधेशाम गुप्ता (वय 57, रा. तापकीरनगर, काळेवाडी, पुणे), सुरज (रा. आकुर्डी), राहुल बनसोडे (रा. निगडी), आम्ले (रा. रुपीनगर, निगडी), केंद्रे (रा. यमुनानगर, निगडी), मावळे (रा. नारायणगाव, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. बाळासाहेब, कल्पेश आणि छोटेलाल या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रवीण दळे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाळासाहेब, कल्पेश आणि छोटेलाल या तिघांनी शासकीय रेशनिंग दुकानातील गहू, तांदूळ हा माल अवैधरित्या चढ्या भावाने काळ्या बाजारात विकण्यासाठी बाळगला. आरोपी छोटेलाल याने सुरज, राहुल, आम्ले, केंद्रे यांच्याकडून शासकीय रेशनिंगचा तांदूळ व गहू काळ्या बाजारात विकण्यासाठी घेतला. तर हा सर्व माल आरोपी मावळे याला विकला जाणार होता.

याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट चारला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून एक ट्रक, त्यात 358 पोती गहू, 605 पोती तांदूळ असा एकूण 28 लाख 29 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button