breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीमुंबई

दुःखद बातमी : आंतरराष्ट्रीय कीर्तीचा बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचे कोरोनामुळे निधन

नवी मुंबई | प्रतिनिधी

बॉडीबिल्डिंगमधले सर्वोच्च किताब जिंकणारा मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड (वय 34) यांचे कोरोनामुळे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. उपचार सुरू असतानाच प्रकृती खालावल्याने त्यांनी बडोद्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने बॉडीबिल्डींग विश्वाला मोठा धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोशिएशन आणि मुंबई असोशिएशनने दुःख व्यक्त केले आहे.

नवी मुंबईत राहणा-या जगदीश लाड यांनी गेल्यावर्षी बडोद्यात व्यायामशाळा उघडली होती. त्यामुळे जास्तीजास्त वेळ जगदीश बडोद्यात असायचे. काही दिवसांपूर्वी त्याला कोरोनाची संसर्ग झाला होता. अखेर उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. जगदीश यांनी फार कमी वयात बॉडीबिल्डिंगला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी विविध पुरस्कार पटकावत या क्षेत्रात आपले वेगळे स्थान प्राप्त केले.

अनेक तरूणांसाठी जगदीश हे प्रेरणास्थान होते. त्यांनी नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता. महाराष्ट्र श्रीमध्ये जवळपास चार वेळा सुवर्णपदक मिळवली होती. एवढेच नाही तर मिस्टर इंडिया स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदकावर नाव कोरल होते. तसेच मुंबईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही त्यांनी कांस्य पदक मिळवले होते. एक नावाजलेला चेहरा गेल्याने बॉडीबिल्डिंग विश्वाचे मोठे नुकसान झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button