ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

एस. एन.बी.पी. विधी महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती

पिंपरी ,प्रतिनिधी

एस. एन.बी.पी. विधी महाविद्यालय, मोरवाडी, पिंपरी , पुणे येथे आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत नुकतेच महिलांचे कायदेविषयक शिबीर व पिंपरी चिंचवड अडव्होकेट बार असोसिएशनच्या
नवनिर्वाचित सदस्याचा सत्कार समारंभ पार पडला.एस. एन.बी.पी. विधी महाविद्यालय, मोरवाडी, पिंपरी , पुणे आणि’ पुणे जिल्हा विधी सेवा केंद्र ,पुणे , पिंपरी चिंचवड न्यायालय, मोरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने “आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रम अंतर्गत’’ महिलांचे कायदेविषयक शिबीर” व पिंपरी चिंचवड अडव्होकेट बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित सदस्याचा सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला.

यावेळी पिंपरी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. आर पठाण , न्यायाधीश पी. सी. फटाले, आर. आर. काळे , एन. टी. भोसले , संस्थेचे संस्थापक डॉ. डी. के. भोसले, एस. ई. सोसायटीच्या अध्यक्षा
डॉ. वृषाली भोसले, संचालिका अ‍ॅड. ऋतुजा भोसले,प्राचार्या डॉ. रोहीणी जगताप,समन्वयक स्वप्नील जाधव , सह समन्वयक अजय पाटील आदि उपस्थित होते.
प्रा. स्वप्नील जाधव यांनी प्रास्ताविक केले.

प्राचार्या डॉ. रोहीणी जगताप यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. विधी पदवीच्या शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासासाठी सायबर लॉ, मेडिएशंन लॉ, लेबर लॉ, टेक्सेशंन लॉ मधील पदविका सुरु केलेची माहिती त्यांनी दिली. महिलांचे सबलीकरण व्हावे , महिलांचे कायदेविषयक अधिकार याबाबत जाणीव व जागृती व्हावी यासाठी “महिलांचे कायदेविषयक शिबीर” आयोजित केल्याचे डॉ. रोहीणी जगताप यांनी सांगितले.
या कार्यक्रमात एस. एन.बी.पी. विधी महाविद्यालया तर्फे पिंपरी चिंचवड अडव्होकेट बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित सदस्याचा सत्कार केला. एस. एन.बी.पी. विधी महाविद्यालयाचे बहुसंख्य माजी विद्यार्थी अडव्होकेट बार असोसिएशनवर निवडून आले आहेत.

मुख्य न्यायाधीश पठाण यांनी
विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच कठोर परिश्रम, सामाजिक निरीक्षण करणे गरजचे असल्याचे सांगितले. कायद्याची पदवी संपादन करत असताना मिळालेल्या ज्ञानाचा दैनंदिन जीवनात वावरताना स्वतःच्या व समाजाच्या विकासासाठी उपयोग करावा . महिलांचा शारीरिक व मानसिक छळापासून संरक्षण करणारा कायदा , महिंलांचे शैक्षणिक अधिकार , संपत्ती मधील समान अधिकार यांचे विस्तृत माहिती दिली.
न्यायाधीश फटाले यांनी मनोगत व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button