क्रिडाताज्या घडामोडीराष्ट्रिय

रशियाची युरोपियन स्पर्धेची दावेदारी अडचणीत?

एपी, लंडन | रशियन फुटबॉल संघटनेकडून युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या यजमानपदासाठी दावेदारी करण्यात आली आहे. मात्र युक्रेनवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ‘युएफा’कडून रशियाच्या या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण केला जाण्याची शक्यता आहे.

‘युएफा’कडून याआधीच रशियाच्या राष्ट्रीय आणि क्लब संघांना आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागावर बंदी घालण्यात आली आहे. रशियन फुटबॉल संघटनेच्या कार्यकारी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत २०२८ आणि २०३२च्या युरोपियन स्पर्धेच्या यजमानपदासाठी प्राथमिक दावेदारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. २०२८च्या स्पर्धेसाठी ब्रिटन-आर्यलड यांनी संयुक्तपणे दावेदारी केली आहे. मात्र रशियाने उशिरा यजमानपदासाठी प्रवेशिका दाखल केल्याने त्यांना आव्हान निर्माण झाले आहे. तुर्कीनेदेखील २०२८च्या स्पर्धेसाठी दावेदारी उपस्थित केली आहे. २०३२च्या यजमानपदासाठी रशियासह इटलीने दावा केला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button