breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

यूक्रेनविरोधात रशियाची युद्धाची घोषणा

मास्को | टिम ऑनलाइन
रशिया आणि युक्रेनमधील वादाची  ठिणगी आरपार होणार आहे, याचे संकेत मिळाले आहेत. यूक्रेनविरोधात रशियाने युद्धाची घोषणा केली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ही युद्धाची घोषणा केली आहे. त्यामुळे जगावर तिसऱ्या युद्धाचे ढग अधिक दाटले आहेत.

डोनबासमध्ये स्पेशल ऑपरेशन करण्याची पुतीन यांनी घोषणा केली आहे. यूक्रेन आर्मीने शस्त्र टाकावी आणि घरी जावे, असे पुतीन यांनी म्हटले आहे. आमचा यूक्रेनवर कब्जा करण्याचा इरादा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. युक्रेनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने युद्धाची घोषणा केली आहे. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राने (UN) पुतिन यांना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे.

रशियाने युक्रेनचे दोन तुकडे पाडले
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तणाव कायम आहे. याबाबत युरोपसह पाश्चात्य देशांनी दोन्ही देशांना चर्चा करुन तोडगा काढण्यास सांगितले होते. दरम्यान, रशियाने युक्रेनमधील दोन प्रदेशांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली. यानंतर अमेरिका आणि युरोपसह इतर देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. तरीही रशियाने माघार घेतलेली नाही. युद्धाची घोषणा केली आहे.

कब्जा करण्याचा इरादा नाही – रशिया

निर्बंध असतानाही रशियाने आज युद्धाची घोषणा केली आहे. एएफपी या वृत्तसंस्थेनुसार राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी औपचारिकपणे युद्धाची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण जग ठप्प होईल. संयुक्त राष्ट्राने पुतीन यांना युद्ध थांबवण्यास सांगितले आहे. त्याचवेळी रशियावर कब्जा करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे पुतीन यांचे म्हणणे आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button