पिंपरी / चिंचवड

सुरक्षा रक्षकावर वार करत पिंपरी एमआयडीसी मधील कंपनीत दरोडा

पिंपरी l प्रतिनिधी

पिंपरी एमआयडीसी मधील संदीप स्टील या कंपनीत सात जणांनी मिळून दरोडा घातला. कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला दमदाटी करत त्याच्यावर शस्त्राने वार करत आरोपींनी दरोडा घातला असून सुरक्षा रक्षकाकडील मोबाईल फोन आणि रोख रक्कम तसेच कंपनीतील एक लाख 61 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 10) पहाटे साडेतीन वाजता घडली.

जालिंदर धोंडीबा रोडे (वय 68, रा. आकुर्डी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गण्या, गट्टया आणि त्यांचे पाच साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोडे हे पिंपरी एमआयडीसी मधील संदीप स्टील या कंपनीत वॉचमन म्हणून काम करतात. गुरुवारी पहाटे ते कामावर असताना दोन अज्ञात व्यक्ती कंपनीच्या बंद गेटवरून आत आले. त्यातील गण्या नावाच्या इसमाने फिर्यादी यांना कोयत्याने मारले. त्यानंतर त्यांना धमकावून खाली बसवले आणि अन्य साथीदारांना कंपनीचे गेट खोलून आत घेतले.

फिर्यादी यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना आरोपींनी जखमी केले. हाताने व विटेने मारले. त्यांच्या खिशातून मोबाईल फोन आणि चार हजार 600 रुपये रोख रक्कम आरोपींनी काढून घेतली. त्यांनतर त्यांना धमकावून कंपनीतील मटेरियल आणि मशिनरी असा एकूण एक लाख 61 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button