पिंपरी / चिंचवड

रोड रोलर चालकाने तंबाखू न दिल्याने कामगाराकडून दगडाने मारहाण

पिंपरी l प्रतिनिधी

रोडरोलर चालकाने रस्त्याच्या कामावर काम करत असलेल्या एका कामगाराला तंबाखू दिली नाही. या कारणावरून कामगाराने रोड रोलर चालकाला दगडाने मारहाण करून दुखापत केली. ही घटना शनिवारी (दि. 19) दुपारी बहुळ गावात घडली.

विलास महादेव शितोळे (रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुळ गावात स्मशानभूमीकडे जाणा-या रस्त्याचे काम सुरु आहे. या कामावर फिर्यादी रोड रोलर चालवण्याचे काम करतात. ते शनिवारी दुपारी रोलरवर बसले असताना आरोपी अनिल हा त्यांच्याकडे आला. त्याने फिर्यादी यांना तंबाखू मागितली. मात्र फिर्यादी यांनी अनिल याला तंबाखू दिली नाही. त्यामुळे आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करून हाताने झटापट केली. तसेच रस्त्यावरील दगडाने फिर्यादी यांना मारून जखमी केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button