breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
कोळसा, डिझेल दरवाढीमुळे सिमेंटच्या दरात वाढ होणार
नवी दिल्ली – डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्चात झालेली वाढ आणि कोळसा दरवाढीमुळे महागलेली वीज यामुळे सिमेंटच्या दरात पुढील काही महिन्यात गोणीमागे १५ ते २० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे सिमेंटच्या गोणीचा दर ४०० रुपयांचा स्तर गाठण्याची शक्यता आहे, अशी माहिती क्रेडिट रेटिंग एजन्सी क्रीसिलने दिली.
सध्या मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असल्याने सिमेंटच्या मागणीत वाढ झाली आहे. असे असताना वीज आणि इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सिमेंटच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. यामुळे सिमेंटच्या किरकोळ बाजारातील विक्रीच्या दरात १५ ते २० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांधकाम खर्चात वाढ होऊन त्याचा परिणाम घरांच्या किंमतीवरही होण्याची शक्यता आहे.