breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र

रिकी केज यांनी तिसऱ्यांदा कोरलं ग्रॅमी पुरस्कारावर नाव

‘डिव्हाइन टाइड्स’ या अल्बमसाठी रिकी केज यांना ग्रॅमी पुरस्कार

Grammy Awards 2023 : संगीतप्रेमींसाठी मानाचा असणारा ग्रॅमी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. पुरस्कार सोहळ्याला संगीत विश्वातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात भारताच्या रिकी केज यांनी तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कारावर नाव कोरलं आहे. हि एक भारतीयांसाठी कौतुकाची बाब आहे.

रिकी केज यांना त्यांच्या ‘डिव्हाइन टाइड्स’ या अल्बमसाठी ‘बेस्ट इमर्सिव्ह ऑडिओ अल्बम’ हा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. रॉकी-लेजेंड स्टीवर्ट कोपलँड यांच्यासह मिळून त्यांनी या अल्बमची निर्मिती केली होती. तिसऱ्यांदा ग्रॅमी जिंकणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. यापुर्वी २०१५ मध्ये पहिल्यांदा या पुरस्कारावर नाव कोरलं होतं. त्यानंतर गेल्या वर्षी २०२२ मध्ये त्यांनी दुसऱ्या ग्रॅमी पुरस्काराची कमाई केली होती. त्यांनी केलेल्या या विक्रमामुळे जगासमोर सर्व भारतीयांची मान अभिमानने उंचावली आहे.

मला नुकताच तिसरा ग्रॅमी पुरस्कार मिळाला. माझ्या भावना सध्या मला शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाहीयेत. मी सर्वांचा ऋणी आहे. हा पुरस्कार मी माझ्या भारत देशाला समर्पित करत आहे, अशी पोस्ट केली आहे.

‘डिव्हाइन टाइड्स’ या अल्बममध्ये एकूण नऊ गाणी आणि आठ म्युझिक व्हिडीओंचा समावेश आहे. या म्युझिक व्हिडीओंमध्ये जगभरामधील नैसर्गिक सौदर्य दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गाण्यांची प्रेरणा पर्यावरणाकडून येत असल्याचे त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button