breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका नवीन आयुक्तांसमोर भोसरीतील विकासकामांचा आढावा

महापालिका भवनात आमदार महेश लांडगे यांची मॅरेथॉन बैठक
महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्याचे आयुक्त राजेश पाटीलांचे आश्वासन

पिंपरी । प्रतिनिधी
भोसरी विधानसभा मतदार संघाअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यात येईल. नागरिकांसाठी पायाभूत सुविधा निर्धारित वेळेत उपलब्ध करुन देण्याबाबत प्रशासन प्रशासन कटिबद्ध आहे, असे आश्वासन नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांनी दिले.
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत महापालिकेत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे, आयुक्त राजेश पाटील, शहर अभियंता राजन पाटील, सहशहर अभियंता श्रीकांत सवने, विजय लडकत, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, शिक्षण विभागाच्या ज्योत्स्ना शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते.
भोसरी विधानसभा मतदार संघातील देशातील सर्वात उंच छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचे काम सुरू झाले आहे. या शंभूसृष्टीच्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच, संतपीठाच्या कामाला गती देवून सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी मी स्वत: आग्रही आहे, असे आयुक्त राजेश पाटील यांनी म्हटले आहे.
तसेच, मराठी शाळांचा शास्ती माफ करणे व थकीत कर भरण्यासाठी मुदतवाढ करणे. मराठी शाळा सक्षमपणे सुरू ठेवायच्या असतील तर याबाबत सकारात्मक निर्णय घेणे अपेक्षीत आहे, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली.
यासह पुणे – नाशिक महामार्ग रुंदीकरणाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा करावा. स्पाईन रोड बाधित नागरिकांना भूखंड वाटप व रोडचे काम सुरू करण्याबाबत प्राधिकरणसोबत चर्चा करावी, चिखलीतील प्रस्तावित हॉस्पिटल आणि शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्याबाबत प्रारुप आराखडा तयार करावा. आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडिअमच्या कामासाठी सल्लागार नेमणूक झाली आहे. पुढील कार्यवाहीबाबत आढावा बैठक घेणे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची परवानगी घेवून नियोजन करावे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि राज्य सरकारचा एकत्रित प्रकल्प सफारी पार्क प्रस्तावित आहे. याबाबत पुढील कार्यवाहीबाबत पाठपुरावा करावा आदी मागण्या आमदार लांडगे यांनी केल्या आहेत.
पाणीपुरवठ्याच्या प्रस्तावित कामांना गती द्या…
२०५० च्या लोकसंख्येचा विचार करता पाण्याचे नवीन स्त्रोत तयार करणे. त्याबाबत सर्व नगरसदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा घेवून त्याअनुशंगाने नियोजन करणे आवश्यक आहे. तसेच, पवना भूमिगत जलवाहिनी आणि पाणीपुरवठा योजनेबाबत सकारात्मक तोडगा काढावा. आंद्रा, भामा आसखेड पाणीपुरवठा योजना गतीमान करावी. त्यासाठी तळवडे जॅकवेल व १०० एमएलडी पाणीपुरवठा योजना, पाणी रिसायकल रियुज प्रकल्प निविदा अंमलबजावणी करावी, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली. चऱ्होली येथे ५ एमएलडी रिसायकल रियुज प्रोजेक्ट गरजेचा आहे. इपीसी तत्त्वावर सदर निविदा काढून प्रकल्प मार्गी लावावा. गेल्या तीन वर्षांपासून विविध कारणांमुळे सदर प्रकल्प लांबणीवर पडत आहे. शहरातील एसटीपीचे १०० एमएलडी टर्शरी ट्रिटमेंट करुन पाणी रावेत बंधाऱ्यापडीलकडे सोडणे. त्या पाण्याचा पुनर्वापर करणे आणि डिस्ट्रिब्यूशन नेटवर्किंगचे दोन पॅकेजचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याबाबत महापालिका प्रशासनाने प्रभावी कार्यवाही करावी, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी यावेळी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button