breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

गणेश विसर्जनाला पुण्यात निर्बंध, पाहा काय आहेत नियम

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील निर्बंधाची घोषणा केली

पुणे – येत्या रविवारी गणपती बप्पा आपला निरोप घेणार आहेत. प्रत्येकवर्षी गणपतीला वाजतगाजत निरोप दिला जातो. मात्र, यंदाही राज्यावर कोरोनाचं संकट घोंगावत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून पुण्यात यंदा गणेशउत्सवावर निर्बंध घालण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. पुण्यातील कोरोना संदर्भात उपाय योजना आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली. यामध्ये त्यांनी रविवारी, 19 सप्टेबर 2021 रोजी गणपती विसर्जनात सर्व दुकाने बंद राहतील असा निर्णय बैठकीत झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. जिल्ह्यातले सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांनी मिळून हा निर्णय घेतला असल्याचंही पवार यांनी सांगितलं.

गणेश विसर्जनाच्या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेस्टॉरंट-हॉटेल सुरू राहणार आहेत. मात्र, इतर सर्व दुकानं रविवारी पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांनी खरेदीसाठी गर्दी करू नये, रस्ते, पदपथांवर मूर्ती विक्री स्टॉल लावू नयेत, तसेच प्रतिष्ठापना आणि विसर्जन सोहळ्यासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांना यंदाही परवानगी देण्यात येणार नाही.

गणेश विसर्जनाच्या दिवशी रविवारी (ता. १९) पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि कॅन्टोनमेंट क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेस्टॉरंट आणि हॉटेल्स सुरू राहतील. तसेच, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून, परिस्थिती आटोक्यात आल्यास येत्या दोन ऑक्टोबरला बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी कोरोना उपाययोजना संदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त राजेश पाटील या वेळी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, सध्या कोरोना बाधित रुग्ण आणि मृत्यू दरात घट झाली आहे. रुग्ण वाढीचा दर ०.०५ टक्क्यांवर आला आहे. शहर आणि जिल्ह्यात आजअखेर 93 लाख नागरिकांना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. या सप्टेंबर महिन्यातही 19 लाखांचा टप्पा ओलांडण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे. पुणे जिल्ह्यात 77 टक्के लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस तर, 41 टक्के नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये बाधित होण्याचे प्रमाण हे ०.०३० टक्के इतके आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button