breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

देशाच्या राजकारणात अटलजींना आदराचे स्थान : माजी महापौर नितीन काळजे

  • माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीदिनी अभिवादन

पिंपरी | प्रतिनिधी
“अटलबिहारी वाजपेयी हे जनसंघाच्या संस्थापकांपैकी एक होते. 1968 ते 1973 पर्यंत जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांनी 1952 साली प्रथम लोकसभेची निवडणूक लढवली. देशाच्या राजकारणात अटलींना आदराचे स्थान आहे. त्यामुळेच आज त्यांची जयंती देशभरात साजरी होत आहे, अशा भावना माजी महापौर तथा नगरसेवक नितीन काळजे यांनी व्यक्त केल्या.

पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वतीने देशाचे माजी पंतप्रधान व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची 97 वी जयंती चऱ्होली येथे साजरी करण्यात आली. शहर भाजपाच्या वतीने अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
यावेळी माजी महापौर नितीन आप्पा काळजे, पिंपरी चिंचवड भाजपाचे कोषाध्यक्ष सचिन तापकीर, अजित बुर्डे, भाजपा किसान मोर्चाचे संतोष तापकीर आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड भाजपा कोषाध्यक्ष सचिन तापकीर म्हणाले, “अटलबिहारी वाजपेयी यांचा 25 डिसेंबर 1924 रोजी जन्म झाला. आज त्यांची 97वी जयंती आहे. वाजपेयी तीन वेळा देशाचे पंतप्रधान झाले. सहा दशक ते राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. त्यांचा संपूर्ण कार्यकाळ निष्कलंक राहिला. 2014 सालापासून आजच्या दिवशी ‘सुशासन दिवस’ म्हणून साजरा केला जातो. अटलजींच्या विचाराने वाटचाल करणाऱ्या भाजपाचा सक्रिय कार्यकर्ता असल्याचा मला अभिमान वाटतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button