ताज्या घडामोडीदृष्टीक्षेप

रेणुका आराध्या यांच्या यशस्वी प्रवासाची कहाणी

गरिबी यशाच्या आड येऊ शकत नाही

नवी दिल्ली : गरिबीपासून श्रीमंतीपर्यंतच्या कथा केवळ चित्रपटांतच नव्हे तर वास्तवातही पाहायला मिळतात. मेहनत केल्याने अडचणींवर यशवीपणे मात करता येते, आणि रेणुका आराध्या यांनी हे सिद्धही करून दाखवले आहे. गरिबीतून येत रेणुका यांनी ‘इच्‍छा तेथे मार्ग’ ही म्हण अगदी योग्य सिद्ध करून दाखवली आहे. बेंगळुरू जवळच्या एका छोट्याशा गावात गरीब कुटुंबात रेणुका यांचा जन्म झाला. रेणुका यांना बालपणी हलाखीची परिस्थितीचा सामना केला आहे. वडिलांचे निधन झाल्यावर त्यांच्या आईने एकहाती वाढवले. काहीवेळा रेणुका यांनी भीक मागूनही आपले पोट भरले आहे तर, आज रेणुका करोडोंच्या कंपनीचे मालक बनले आहेत.

दारोदारी जाऊन भीक मागितली
बेंगळुरू जवळच्या एका छोट्याशा गावात गरीब पुजारी कुटुंबात रेणुका यांचा जन्म झाला. रेणुका यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. आर्थिक अडचणी आणि कठीण परिस्थितीचा सामना करून त्यांनी दहावी उत्तीर्ण केली. त्यानंतर जवळच्या मंदिरात पुजारी म्हणून काम करू लागले. पूजेनंतर रेणुका आणि त्यांचे वडील घरोघरी जाऊन तांदूळ, पीठ आणि डाळ मागायचे.

घरगुती काम करू लागले
याच वेळी घरोघरी जाऊन भिक्षाही मागायचे. वडिलांसोबत घरोघरी जाऊन लोकांकडे तांदूळ, पीठ आणि डाळी मागायचे, पण जगणे अवघड होते. रेणुका इतर लोकांच्या घरी झाडू मारायचे, धुनी-भांडीचेही काम करू करायचे. वयाच्या २० व्या वर्षी रेणुका आराध्याचे लग्न झाले. घरात आणखी एक व्यक्ती वाढल्याने जबाबदारी वाढली त्यामुळे रेणुका यांनी सुरक्षा रक्षक (गार्ड/वॉचमन) आणि मजूर म्हणून काम करत राहिले. त्यानंतर रेणुका प्लास्टिकच्या कारखान्यात रुजू झाले.

इथून मिळाली प्रेरणा
वाढलेल्या जबाबदारीमुळे आपण अधिक मेहनत करू आणि अधिक पैसा कमवू शकू असा त्यांचा विश्वास होता. त्यांची पत्नीही एका कारखान्यात मदतनीस म्हणून काम करायची. तर रेणुका यांनी रक्षक म्हणून काम सुरू केले. त्यानंतर त्यांनी मशीन ऑपरेशन शिकले आणि कारखान्यात लेथ मशीन चालवण्यास सुरुवात केली, त्यानंतर प्लास्टिकच्या कारखान्यात काम करू लागले जिथून त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. विशेषत: इथून त्यांना सूटकेस कव्हरचा व्यवसाय करण्याची कल्पना सुचली पण व्यवसायात सुरुवातीला ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्यानंतर त्यांनी पुन्हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी सुमारे चार वर्षे ट्रॅव्हल एजन्सीमध्ये ड्रायव्हर म्हणून काम केले.

बघता बघता बनले करोडपती
त्यानंतर रेणुकाने आपली बचत आणि बँकेचे कर्ज घेऊन पहिली कार खरेदी केली. तसेच प्रवासी कॅब्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीचा पाया घातला. हळूहळू आपला व्यवसायाचा विस्तर केल्यानंतर रेणुका यांनी सुमारे सहा लाख रुपयांना आणखी एक कॅब कंपनी विकत घेतली. अमेझॉन इंडियाने प्रमोशनसाठी तिची निवड केल्यावर रेणुका यांचा व्यवसाय सुरू झाला. कालांतराने वॉलमार्ट आणि जनरल मोटर्ससारख्या मोठ्या कंपन्यांनी रेणुकासोबत भागीदारी केली, ज्यामुळे कंपनीची उलाढाल ४० कोटींहून अधिक झाली. सध्या त्यांच्या कंपनीत १५० हून अधिक लोकांना रोजगार मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button