TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मेट्रोचे नामकरण ‘पुणे-पिंपरी चिंचवड मेट्रो’ करा; विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांचे शरद पवार यांना निवेदन

पिंपरी | पिंपरी ते निगडी सेंकड फेजचा डी.पी.आर. तयार करुन राज्यशासनाने केंद्राकडे पाठविला आहे. त्याबाबत केंद्रसरकारकडे तो त्वरीत मान्य करुन घेण्यात यावा. आणि पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम त्वरीत सुरु करण्यात यावे. त्याच प्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रोस ‘पुणे-पिंपरी चिंचवड मेट्रो’ असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केली.

शरद पवार यांनी आज फुगेवाडी ते पिंपरी मेट्रोचा प्रवास केला. यावेळी राजू मिसाळ यांनी या मागण्यांचे निवेदन पवार यांना दिले.

राजू मिसाळ यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महत्वकांशी प्रकल्पापैकी पिंपरी चिंचवड मेट्रो हा एक प्रकल्प आहे. पिंपरी चिंचवड मनपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या प्रकल्पास मंजूरी दिलेली आहे. त्याच प्रमाणे राज्यात महाआघाडीचे सत्ता आली असताना राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रोसाठी भरीव आर्थिक तरतूद केलली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी ते फुगेवाडी या मेट्रोचे काम पूर्णत्वास गेले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करुन फुगेवाडी ते पिंपरी असा प्रवास केला व मेट्रोच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्या सोबत खासदार वंदना चव्हाण, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ,राष्ट्रवादी काँग्रेचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे,कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, पुणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, माजी विरोधी पक्षनेता नाना काटे, माई काटे नगरसेविका, प्रवक्ते फजलभाई शेख व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी विरोधी पक्षनेता राजू मिसाळ यांनी पिंपरी ते निगडी सेंकड फेज डी.पी.आर. तयार करुन राज्य शासनाने केंद्राकडे पाठविला आहे. त्याबाबत केंद्रसरकारकडे तो त्वरीत मान्य करुन घेण्याबाबत व पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम त्वरीत सुरु करणेविषयी मागणी केली त्याच प्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रोस पुणे पिंपरी चिंचवडअसे नामकरण करणेबाबत आग्रही मागणी केली. याबाबत मा. पवार साहेब यांनी दोन्ही मागण्याबाबत सकारात्मकता दर्शवून वरील दोन्ही मागण्या पूर्ण करणेबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करु असे आश्वासन दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button