TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

माता रमाई आंबेडकर यांच्या स्मारकाच्या नियोजित जागेवरील अतिक्रमण हटवा; महापौरांची प्रशासनाला सूचना

पिंपरी चिंचवड | त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मारकासाठी महापालिकेच्या वतीने पिंपरी चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्यामागील स्वतंत्र जागा घोषित करण्यात आली आहे. या जागेवर असलेले अतिक्रमण हटवून तेथे सीमाभिंत उभारावी, अशी सूचना महापौर उषा ढोरे यांनी प्रशासनाला दिली.त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकाची माहिती आणि आढावा घेण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर यांनी नुकतीच महापालिकेला भेट दिली होती. या स्मारकासाठी स्वतंत्र जागा असावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. तसेच विविध पक्ष संघटनांची देखील तशी मागणी होती.

या पार्श्वभूमीवर महापौर ढोरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी येथील पुतळ्याच्या मागील मोकळी जागा या स्मारकासाठी देण्याचा निर्णय घोषित केला होता. या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचे भव्य रचनात्मक स्मारक महापालिका उभारणार असल्याचे महापौर ढोरे यांनी सांगितले होते.

दरम्यान, शहरातील विविध पक्ष संघटनांच्या शिष्टमंडळाने आज (सोमवारी) महापौर ढोरे यांची भेट घेऊन त्या जागेवर अतिक्रमण आणि अनुचित प्रकार होत असल्याच्या तक्रारी मांडल्या. तसेच या जागेला सीमाभिंत घालून संरक्षित करण्यात येऊन त्या जागेवर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी. या जागेवर ‘माता रमाई स्मारकासाठी राखीव जागा’ असा फलक लावावा. तेथील अतिक्रमणावर कारवाई करावी, या ठिकाणी रखवालदार नेमावेत अशा विविध मागण्या शिष्टमंडळाने केल्या. या मागण्यांची तात्काळ दखल घेत प्रशासनाला योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर उषा ढोरे यांनी दिले.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकिय भवनातील महापौर कक्षात झालेल्या या चर्चेवेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, सागर आंगोळकर, नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, स्विकृत सदस्य राजेंद्र कांबळे, सहशहर अभियंता मकरंद निकम, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह भारतीय बौध्द महासभेचे शहराध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राज्य पदाधिकारी चंद्रकांता सोनकांबळे आदी उपस्थित होते.

तसेच, बाळासाहेब भागवत, सुधाकर वारभुवन, शहराध्यक्ष स्वप्नील कांबळे, कार्याध्यक्ष सिंकदर सुर्यवंशी, वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, पदाधिकारी गुलाब पानपाटील, संतोष जोगदंड, राजन नायर, एमआयएमचे शहर अध्यक्ष धम्मराज साळवे, प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष विनोद गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए ) चे धुराजी शिंदे , सामाजिक कार्यकर्ते रमेश चिमुरकर, कमल कांबळे, के. एम. बुक्तर, लिंबराज कांबळे, रुहीनाज शेख, अशोक सरतापे, संतोष शिंदे, विजय ओहोळ, प्रकाश बुक्तर, हौसराव शिंदे, सम्राट जकाते, मनोज गजभार, दशरथ ठाणांबीर देखील उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button