breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

भोसरी जमीन खरेदी प्रकरणी खडसेंना दिलासा, तात्पुरता जामीन मंजूर

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाकडून त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने एकनाथ खडसे यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ३१ कोटी रुपये किंमत असलेली जमीन फक्त ३.७ कोटी रुपयांना विकल्याचा दावा आरोपांत करण्यात आला आहे. त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी भोसरी येथील एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. 52/2 अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून 3.75 कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत, असेही आरोप त्यांच्यावर आहेत.

या व्यवहाराखाली गिरीश यांनी पाच शेल कंपन्यांकडून आलेला पैसा वापरल्याचे कागदोपत्री निष्पन्न झालेले आहे. या सर्व व्यवहारात राज्य सरकारचे सुमारे 61 कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. म्हणून गिरीश चौधरी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावून त्यांना अटक केली होती. एकनाथ खडसे यांचीही याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button