ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरातील पाणीपुरवठा नियमित करा; नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिका आयुक्तांना निर्देश

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नागरिकांना 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अमृत योजना अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी या योजनेच्या कामाला गती देण्यात यावी. ही योजना पूर्ण होईपर्यंत देखील शहरातील नागरिकांना एक दिवसाआड सुरु असलेला पाणी पुरवठा नियमित करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिले.पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील विविध विकासकामांचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत आढावा घेतला. या बैठकीस विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यसभा खासदार संजय राऊत, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी आणि महेश पाठक , पिंपरी – चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील, शिवसेना शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत नोव्हेंबर 2019 पासून पहिल्यांदा दोन महिन्यांसाठी एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. त्यांनतर तो कायम ठेवण्यात आला आहे. आजमितीला धरणात 99.14 टक्के पाणीसाठा आहे. पुढील वर्षभर पुरेल एवढा हा साठा आहे. त्यामुळे पाण्याची चिंता संपली. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठ्यातून सुटका होईल. दररोज पाणी मिळेल अशी शहरवासीयांना अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली. एका दिवसाआड सुरु असलेला पाणीपुरवठा कायम ठेवला आहे.पाणी कतापीपासून शहरवासीयांची सुटका झालेली नाही. याची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली. पिंपरी – चिंचवड महापालिकेतील नागरिकांना 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अमृत योजना अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याचे समजले. शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी या योजनेच्या कामाला गती देण्यात यावी. ही योजना पूर्ण होईपर्यंत देखील शहरातील नागरिकांना एक दिवसाआड सुरु असलेला पाणी पुरवठा नियमित करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री शिंदे यांनी आयुक्तांना दिले. त्यामुळे आता तरी शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा होईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पवना धरणाची आजची परिस्थिती!

# गेल्या 24 तासात झालेला पाऊस = 29 मि.मि.

# 1 जूनपासून झालेला पाऊस = 2186 मि.मि.

# गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 579 मि.मि.

#धरणातील सध्याचा पाणीसाठा = 99.14% टक्के

#गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = 99.42% टक्के

#गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ = 0.28% टक्के

# 1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = 67.55% टक्के

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button