ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेकडे स्वत: मालमत्तेची नोंदणी करा अन् सामान्य करामध्ये 5 टक्के सवलत मिळवा

पिंपरी चिंचवड | कर आकारणीसाठी स्वत: मालमत्तेची नोंदणी करणा-या मालमत्ताधारकांना पिंपरी-चिंचवड महापालिका सामान्य करात 5 टक्के सवलत देणार आहे. ‘माझी मिळकत, माझी आकारणी’ या योजनेद्वारे स्वयंस्फुर्तीने मालमत्ता कराची नोंदणी करणा-यांना प्रोत्साहन देण्यासाठी सवलत दिली जाणार आहे. महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणा-या मालमत्ताधारकांना सामान्य करामध्ये पहिल्यावर्षाकरिता 5 टक्के सवलत दिली जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने मान्यता दिली.

कोरोनामुळे महापालिका कार्यक्षेत्रामध्ये फिरण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. दरम्यानच्या कालावधीमध्ये नव्याने बांधकामे झाली आहे. या मालमत्तांना प्राधान्याने कर आकारणी होणे आवश्यक आहे. मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी मालमत्ताधारक स्वत: महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरील शिघ्रगणकाद्वारे मालमत्ता नोंदणीसाठी अर्ज करत असेल तर, अशा मालमत्तांना सवलत देण्यात येणार आहे. त्यासाठी ‘माझी मिळकत, माझी आकारणी’ ही योजना सुरु करण्यात आली.

कर आकारणी न झालेल्या मालमत्तेची महापालिकेच्या संकेतस्थळावर अथवा स्वत: कर आकारणी नोंदणीसाठी अर्ज करत असेल तर, अशा मालमत्ताधारकांना प्रोत्साहन देण्यासाठी सवलत दिली जाणार आहे. ज्या वर्षात करआकारणी कायम होईल. त्या आर्थिक वर्षाच्या चालू मागणीतील मालमत्ता बिलामध्ये सामान्य करात 5 टक्के सवलत पहिल्या वर्षाकरिता दिली जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने मान्यता दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button