ताज्या घडामोडीमुंबई

एकटया राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी आता नोंदवही; पोलीस आयुक्तांचे आदेश

मुंबई | पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकटया राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची यादी तयार करून त्यांच्या घरी आठवडयातून किमान एका भेट द्या, असे आदेश नवनिर्वाचीत पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी गुरुवारी दिले आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या घरी एकनोंद वही तयार करून भेटीदरम्यान त्यांच्या अडचणींबाबतच्या सविस्तर नोंदी या नोंदवहीत करण्याचे आदेश पांडे यांनी दिले आहेत.

हद्दीतील एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची यादी तयार करून ते बीट पोलीस निरीक्षक व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सादर करण्याचे आदेश बीट अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी एक नोंदवही ठेवावी. याबाबत एक बीट स्तरावरही नोंदवही तयार करावी, असे आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. बीट अंमलदारांनी आठवडयातून किमान एकदा तरी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांची विचारपूस करावी. त्यांच्या अडचणी असल्यास त्याचे निरसन करावे. बीट अधिकाऱ्यांनीही १५ दिवसांतून एकदा ज्येष्ठ नागरिकांच्या घरी भेटी देऊन त्यांच्या तक्रारीचे निरसन झाले की नाही, याची पाहणी करावी. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या घरी अचानक भेट द्यावी असे आदेश पांडे यांनी गुरुवारी दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button