breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

Redmi 9i भारतात लाँच, १८ सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध

नवी दिल्ली – शाओमीने आपल्या रेडमी ब्रँड अंतर्गत नवीन बजेट स्मार्टफोन Redmi 9i भारतात लाँच केला आहे. रेडमीच्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी, अँड्रॉयड 10 बेस्ड MIUI 12 आणि ४ जीबी रॅम यासारखे खास वैशिष्ट्ये आहेत. रेडमी ९ सीरीज मध्ये याआधी कंपनीने रेडमी ९ आणि रेडमी ९ ए स्मार्टफोन लाँच केलेले आहेत.

Redmi 9i ची किंमत
Redmi 9i च्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ८ हजार २९९ रुपये आहे. तर ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ९ हजार २९९ रुपये आहे. फोनला मिडनाइट ब्लॅक, सी ब्लू आणि नेचर ग्रीन कलरमध्ये आणले आहे. हँडसेटला फ्लिपकार्ट, मीडॉटकॉम आणि ऑफलाइन रिटेल स्टोर्सवरून १८ सप्टेंबर दुपारी १२ वाजेपासून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येईल.

Redmi 9i चे वैशिष्ट्ये
रेडमीच्या या फोनमध्ये ६.५३ इंचाचा (1600 x 720 पिक्सल) एचडी+ डिस्प्ले आहे. याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. फोनमध्ये २ गीगाहर्ट्ज ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो जी २५ प्रोसेसर दिला आहे. ग्राफिक्स साठी IMG PowerVR GE8320 जीपीयू आहे. हँडसेटला ४ जीबी रॅम सोबत ६४ जीबी व १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज पर्याय दिले आहेत. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसोबत १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. तर सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोन फेस अनलॉक सपोर्ट करते.

रेडमीचा हा फोन ड्यूल सिम सपोर्ट करतो. हँडसेट अँड्रॉयड 10 सोबत MIUI 11 वर काम करतो. या फोनला MIUI 12 वर अपग्रेड केले जावू शकते. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे. १० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. कनेक्टिविटी साठी ड्यूल 4जी वीओएलटीई, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 5, जीपीएस, 3.5 एमएम ऑडियो जॅक, एफएम रेडियो आणि मायक्रो यूएसबी यासारखे फीचर्स दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button