ताज्या घडामोडीपुणे

पुणे महापालिकेतील डॉक्टर भरती रखडली

पुणे | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी लढा देण्यासाठी महापालिका तयारी करत असताना दुसरीकडे आरोग्य विभागातील रिक्तपदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दीड वर्षापूर्वी अर्ज करूनही डॉक्टर भरती केली नसल्याचे समोर येत आहे. महापालिका प्रशासनाच्या या वेळकाढू कार्यपद्धतीवर आप आदमी पक्षाने टीका करत, त्वरित पदभरती करण्याची मागणी आपचे राज्य संघटक विजय कुंभार, प्रवक्ते डॉ. अभिजित मोरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

कोविड साथीच्या आपत्तीचा इष्टापत्ती म्हणून करुण आरोग्य व्यवस्था बळकट करण्याची संधी होती. महापालिकेच्या दवाखान्यांमधील आरोग्य सुविधा सुधारण्याची संधी होती. याकडे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पक्षाने वारंवार आंदोलने केली, पण प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले.पुणे महानगरपालिकेची डॉक्टर भरती भ्रष्ट कारभाराच्या जंजाळामध्ये अडकली आहे. डॉक्टर भरतीमध्ये वशिल्याच्या लोकांना संधी मिळावी यासाठी भरती प्रक्रिया प्रचंड काळ लांबवत ठेवली जात आहे. आरोग्य विभागात वर्ग एकच्या १२०, वर्ग दोनच्या ५७ अशा एकूण ३२ संवर्गाच्या १७७ डॉक्टरांची सरळसेवा भरती करण्यासाठी एप्रिल २०२० रोजी जाहिरात दिली होती.

मे महिन्यात कागदपत्रांच्या छाननीकरीता उमेदवारांना बोलावण्यात आलेले होते. प्रारूप यादी जुलै २०२० मध्ये प्रसिद्ध केली होती. जाहिरातीतील १७७ पदांपैकी फक्त ८१ उमेदवारांना पदस्थापना मिळालेली आहे, पण अजूनही ९६ पदांची भरती प्रक्रिया रखडली आहे.

त्यातील २४ पदांच्या प्रारूप यादी बनवून देखील गेली दीड वर्षे अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेली नाही. भ्रष्टाचार, आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी आणि राजकीय लागेबांधे असणाऱ्या उमेदवारांना घेण्यासाठीच ही प्रक्रिया मुद्दाम रखडवली गेली आहे, असा आरोप विजय कुंभार व डॉ. अभिजित मोरे यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button