आरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात नवीन 56 रुग्णांची नोंद, 64 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 56 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 64 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.महापालिका हद्दीबाहेरील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 519 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 78 हजार 405 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 367 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 153 रुग्ण गृहविलगीकरणात असून 214 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 24 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 254 आहेत. आज दिवसभरात 10 हजार 922 नागरिकांचे लसीकरण झाले असून आजपर्यंत 28 लाख 82 हजार 270 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button